फलटण येथून राजेंद्र रणवरे बेपत्ता


दैनिक स्थैर्य । 30 जुलै 2025 । फलटण । सगुणामातानगर, मलठण (ता. फलटण) येथील राजेंद्र नारायणराव रणवरे (वय 56) हे शनिवारी (दि. 26 जुलै) सकाळी सुमारास वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडून गेले होते. मात्र, त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नसून ते बेपत्ता असल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

राजेंद्र रणवरे त्यांच्या वयस्कर आई प्रमिला (वय 85) यांच्यासमवेत राहत होते. काही दिवसांपासून मानसिक आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर येथील डॉ. खराडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रमाकांत कदम यांच्या वर्षश्राद्धासाठी म्हून घराबाहेर पडले ते अद्यापर्यंत परत आलेच नाहीत. या घटनेनंतर त्यांचा पुतण्या सुमित भोईटे याने विविध ठिकाणी, नातेवाईक, परिचित यांच्याकडे शोध घेऊनही ते सापडले नाहीत. यासंदर्भात ते बेपत्ता असल्याची फिर्याद शहर पोलीस स्टेशन दिली.

राजेंद्र रणवरे यांचे वय: 56 वर्षे, उंची: 5 फूट 11 इंच, रंग: गोरा, चेहरा: उभट, डोळे: काळे, अंगकाठी: मध्यम, केस: काळे, असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. अशा वर्णनांची व्यक्ती जर कोणास आढळली नागरिकांनी जर त्यांच्याविषयी कोणतीही माहिती आढळल्यास तात्काळ फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा मो.नं.9850992288 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे पोलिसांनी आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!