मानबिंदू साहित्य गौरव पुरस्काराने राजेंद्र कांबळे सन्मानित


दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । फलटण । साहित्य गौरव महाउत्सव रंग-तरंग साहित्याचे इनोव्हेटीव्ह मानबिंदू प्रकाशन राष्ट्रीय साहित्य सन्मान सोहळा साहित्य मंदिर वाशी येथे श्री राजेंद्र ज्ञानदेव कांबळे फलटण भिलकटी येथील यांना डॉ. लक्ष्मण शिवणेकर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ साहित्यिक मा.देवेंद्र भुजबळ माहिती संचालक महाराष्ट्र राज्य मा.नयना आपटे अभिनेत्री पुजा काळे अभिनेत्री यांच्या हस्ते मानबिंदू साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी त्यांना सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला राजेंद्र कांबळे यांनी साहित्याच्या विविध क्षेत्रात विशेष योगदान दिल्याने गौरव करण्यात आला व निवड करण्यात आली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक कवी लेखक भारुड गायक यांना आपली कला आपले ज्ञान इतरांना देता येत नाही पण एन डी खान व सलमा खान विलास देवळेकर यांच्या इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन करणार आहे अशी प्रस्तावना करताना एन डी खान यांनी जाहीर केले त्यावेळी राजेंद्र कांबळे यांचे अभिनंदन व कौतुक सर्वत्र होत आहे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कांबळे साहित्यिक राजेंद्र सावंत गायक विजय मोरे उत्तमराव तरकसे क्राईम ब्रँच साहित्यिक होमगार्ड कमांडर माझी ..महेश भोसले शीतल ओंबासे यांनी अभिनंदन केले देशभक्ती गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!