डॉ.बाबासाहेब आंबेडकर मानवी हक्क पुरस्काराने राजेंद्र कांबळे सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । फलटण । भिलकटी येथील समाजसेवक राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती आयोजित कार्यक्रमात मा . खासदार माजी हरिभाऊ राठोड अभिनेत्री डॉ.पद्मजा खटावकर मनोहर कांबळे कायदे तज्ञ सोनिया गजभिये यांच्या हस्ते श्री राजेंद्र कांबळे यांना मोठ्या थाटामाटात राष्ट्रस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवी हक्क पुरस्कार 2022 जनता केंद्र मुंबई सेंट्रल येथे प्रदान करण्यात आला त्यावेळी मैत्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज भोईर सामाजिक कार्यकर्ता समिती यांनी राजेंद्र कांबळे यांचे सामाजिक कार्य चांगले असल्याने त्यांची निवड केली त्यांनी प्रथम होमगार्ड संघटनेत भरती होऊन समाजसेवा देश सेवा सुरू केली एसटी महामंडळात फलटण आगारात सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य केले प्रामाणिकपणा मुळे त्यांनी प्रकाश चांगन यांचे बस मध्ये हरवलेले पैसे मिळवून दिले त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दलचा आगारामध्ये बराच वेळा सत्कार करण्यात आला सध्या ते कराड अर्बन बँकेमध्ये कार्यरत असून चांगल्या प्रकारे सेवा देतात त्यांना आज पर्यंत अर्धशतक होऊन जास्त पुरस्काराचे मानकरी आहेत त्यांचे सामाजिक कार्य पाहून संस्थापक अध्यक्ष सुरज भोईर यांनी त्यांची निवड केली व त्यांचे कौतुक केले त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे त्यावेळी आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड कवी साहित्यिक शांताराम कारंडे गायक विजय मोरे संतोष भोईर साहेब गायक कपिल इत्यादी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले सूत्रसंचालन सुरज भोईर यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!