दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । सातारा । इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आरटीई रकमेची पूर्तता होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करून आर्थिक सहाय्य लवकरात लवकर प्राप्त करून देईन, अशी ग्वाही दिली, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली आहे.
तीन वर्षाहून अधिक काळ राज्य शासनाकडून वितरीत केली जाणारी आरटीई परतावा रक्कम प्राप्त होण्यास अनेक अडचणी निर्माण होऊन इंग्रजी माध्यमाचे संस्था चालक मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत सापडले होते. महाराष्ट्र शासनासह जिल्हा परिषद स्तरावर याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे. या लढ्याअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास नकार दिला होता. यासंदर्भात आज संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जि. पा. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रभावती कोळेकर यांची समक्ष गाठ घेऊन अडचणी मांडल्या व परिस्थितीचे गांभीर्य पदाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले.
या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रभावती कोळेकर यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शैक्षणिक वर्ष 19-20 व 20-21 चे शुल्क परिपुर्ति प्रस्ताव तीन दिवसात सादर करणेचे निर्गमित केले. याप्रसंगी जि. प. अध्यक्ष उदय कबुले यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आरटीई रक्कम लवकरात लवकर प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आर्थिक सहाय्य लवकरात लवकर प्राप्त करून देईन, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी बोलताना राजेंद्र चोरगे म्हणाले की, स्थानिक प्रशासनाची भुमिका ही अत्यंत संवेदनशील असून कोवीड 19च्या विषम परिस्थितीत इंग्रजी माध्यमांसाठी अत्यंत दिलासादायक आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशाबाबत आत्तापर्यंत इंग्रजी माध्यमांच्या शाळा सकारात्मक असून यावर्षी देखील आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊन देणार नाही.
याप्रसंगी इसाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोरगे,महाराष्ट्र सहसचिव अमित कुलकर्णी,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप वलियावेट्टील,श्री नितीन माने,मिथिला गुजर, रोहन गुजर, आँचल शानभाग आदी बहुसंख्य संस्था चालक उपस्थित होते.