दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । आटपाडी । स्वतंत्र आटपाडी तालुका, स्वतंत्र पंचायत समिती, स्वतंत्र मार्केट कमिटी, स्वतंत्र एस.टी.आगार अशा अनेक बाबींच्या माध्यमातून आटपाडी तालुक्याच्या अस्मिता, स्वाभीमानासाठी उभे आयुष्य समर्पित केलेल्या बाबासाहेब देशमुख यांचाच वसा वारसा मोठ्या आक्रमकतेने यापुढच्या काळात राजेंद्रआण्णा देशमुख यांनी चालवावा . असा आशावाद अनेक मान्यवर महोदयांनी व्यक्त केला . खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त काल सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेकडो मान्यवरांनी आण्णांचे अभिष्टचिंतन करून त्यांना दीर्घायुष्याच्या आणि उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या . आमदार – नामदारकीची उंची लाभलेला नेता म्हणूनच राजेंद्रआण्णा देशमुख यांना पश्चिम महाराष्ट्र ओळखतो. १९९५ पूर्वी पर्यत आटपाडी तालुक्यात कृष्णेचे पाणी यावे म्हणून राजेंद्रआण्णा देशमुख यांचे पिताश्री, आटपाडी तालुक्याचे शिल्पकार बाबासाहेब देशमुख यांच्या सह आणि त्यांच्या पश्चात स्वतः राजेंद्रआण्णा देशमुख यांनी जिल्हा – विभागीय नेत्याकडे मोठा आग्रह धरला होता . चर्चित टेंभू योजनेत आटपाडी तालुक्याला डावलले गेल्याचे लक्षात येताच बाबासाहेब देशमुख यांचीच आक्रमकता धारण केलेल्या राजेंद्रआण्णा देशमुख यांनी, मोठी गर्जना करीत “पाणी लावून, पाणी मागण्यापेक्षा, पाणी दावून,पाणी मागणार !” या निर्धाराने अपक्ष म्हणून आमदारकी जिंकली .
मला पद – प्रतिष्ठा – सन्मान देणारे मंत्रीपद नको, फक्त माझ्या भागाला कृष्णामाईचे पाणी द्या ! अशी लक्षवेधी मागणी आमदारकीच्या एकाच टर्म मध्ये सत्यात उतरविण्यास भाग पाडण्यात यशस्वी झालेले आमदार म्हणून राजेंद्रआण्णा देशमुख हजारोंच्या गळ्यातले ताईत बनले . टेंभू योजना रेकॉर्डवर आणून या योजनेच्या कर्जरोखे विक्रीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री महोदयांना आटपाडीत आणून टेंभूचे मोठे काम त्याच पाच वर्षात मार्गी लावणारे, स्वतः विद्यमान आमदार असतानाही ज्यांना पराभूत केले त्यांनाच पुढच्या निवडणूकीत निवडून आणणारे विशाल अंतःकरणाचे दैवी व्यक्तीमत्व म्हणून राजेंद्रआण्णा देशमुख यांना आजही स्वकीयां बरोबर विरोधक ही मोठ्या मनाने नमस्कार करतात.
शिक्षण संस्था, सुतगिरणी, दुध संघ, बॅक, कारखाना इत्यादी अनेक व्यवस्थांच्या माध्यमातून हजारोंच्या घरात विकासाच्या माध्यमातून परिवर्तन आणण्यात पाऊले टाकणारे , सततच्या दुष्काळ आणि विरोधकांच्या टोकाच्या संघर्षाला तोंड देत मार्गक्रमण करणारे, मोडलो तरी चालेल पण कोणापुढे लाचार होणार नाही . या वज्रधारी निर्धारातून कोणत्याही आधाराशिवाय संस्था, उद्योग, संघटना चालवताना मोठ्या राजकीय हानीची, उदयोग, व्यवसाय अडचणीत येण्याची मोठी किंमत मोजणारे, तथापि सर्व संकट, समस्यांना हसतमुखाने सामोरे जाणारे , प्रचंड त्रास, संकटात संयम ढळू न देणारे , खानदानी राजेशाही ऐश्वर्यातही साधे राहणारे , दीन, दलित, अल्पसंख्याक, सर्वसामान्यांसाठी तिळतिळ तुटणारे , त्यांच्या प्रती नम्र राहणारे , शांतता संयमाने प्रत्येक पाऊल टाकणारे आणि याच ध्येय मंत्राने जीवन व्यतित करणारे, उच्च कोटीचे आदरणीय व्यक्तीमत्व म्हणून सांगली – सातारा – सोलापूर जिल्ह्यातील जनता ज्यांच्यावर अपार प्रेम करते . असे त्यागी ध्येयवेडे , शांत, संयमी नेत्याचा अर्थातच राजेंद्रआण्णा देशमुख यांचा हजारो लोक आजही अभिमान बाळगतात . या सच्च्या, सरळमार्गी, अजातशत्रु व्यक्तीमत्वाचा हा लोकनेता पुन्हा विधानसभा अथवा विधान परिषदेवर आमदार किंवा लोकसभा अथवा राज्यसभेवर खासदार म्हणून सन्मानीत व्हावा . एवढेच नव्हे तर १९९५ साली चालून आलेले तथापि भागाच्या पाण्यासाठी नाकारलेले मंत्रीपद, भविष्यात राजेंद्रआण्णा देशमुख यांना मिळावे, आणि हाच त्यांच्या राजकीय सामाजीक जीवनाचा खरा गौरव ठरावा . अशीच भावना त्यांना शुभेच्छा देणाऱ्या शेकडोंच्या अंतःकरणात तरळत होती . अनेकांनी ती भावना आण्णांच्या जवळ बोलूनही दाखविली .
अनेक पिढ्याच्या त्यागातून प्रखर संघर्षातून आणि राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या मोठ्या त्याग व पाठपुराव्यातून प्रत्येकाच्या शेता शिवारात आलेले टेंभूचे अर्थात कृष्णामाईचे पाणीही, राजेंद्रआण्णांना मोठ्या ताकदीने यापुढचा संघर्ष करण्याचे, बाबासाहेब देशमुख यांच्या स्वप्नातला आटपाडी तालुका मोठ्या उंचीला नेण्याचे आणि दमछाक झालेला माणगंगा साखर कारखाना राज्यात नावाजला जावा अशा उत्तुंग आणि व्यापक स्वरूपात उभा करण्याचे, पणाचे धनुष्य राजेंद्रआण्णा देशमुख यांनी सहजगत्या उचलावे. असे अप्रत्यक्षरित्या सुचवित आहे . जिल्हा निर्मितीच्या पंचाहत्तरीत सर्वच क्षेत्रात सर्वात आटपाडी तालुका अव्वल ठरावा, याच भावनेने राजेंद्रआण्णा देशमुख यांनी राजकीय सामाजीक मरगळ झटकुन आपली यशस्वी घोडदौड पुन्हा नव्याने सुरु करावी .आटपाडी तालुका म्हणजे स्वाभीमानी जनतेचा सर्वांगीण विकास हे सुत्र सत्यात आणताना राजेंद्रआण्णा देशमुख यांनी, अभेद्य निर्धार, स्वाभीमानाचे ज्वलंत प्रतिक आणि जिगरबाज नेतृत्व असलेले बाबासाहेब देशमुख बनावे, हीच भावना अनेकांच्या तोंडून व्यक्त होत होती .