दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण, ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेकुरण बंगला, सांगवी येथे गुरुवार, दि. १७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता उद्यानकन्यांद्वारे दहा वेगवेगळया जातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, निंब, करंज, अशी झाडे लावण्यात आली आहेत. तसेच त्यांनी फुलझाडे लावून शाळेचे सुशोभीकरण वाढवले आणि शाळेतील विद्यार्थ्यांना वाढते प्रदूषण व त्यासाठी झाडांचे महत्त्व पटवून दिले.
हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर आणि तळेकर सर यांच्या उपस्थितीत पार पडला. या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील सर आणि प्रा. जे. व्ही. लेंभे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या सायली म्हस्के, शिवांजली माने, पूनम राऊत, सई झगडे, सोनाली कदम, सुप्रिया ठोंबरे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.