तिरकवाडी सोसायटी निवडणूकीत राजे पॅनलचा दणदणीत विजय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । फलटण । तिरकवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकित राजे पॅनेलने सर्व १३ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून सोसायटी मधील आपली सत्ता अबाधीत ठेवली आहे.

सर्वसाधारण मतदार संघातील ३३७ मतदानापैकी १३ मते अवैध ठरली असून वैध ३२४ मतांपैकी खालीलप्रमाणे मते घेऊन राजे पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. आनंदराव तुकाराम सोनवलकर १९८, हणमंत पांडुरंग शिंदे १८६, करीम गुलाब शेख १८५, ज्ञानेश्वर बळीराम सोनवलकर १८१, नेताजी मारुतराव सोनवलकर १८०, काशिनाथ राजाराम शिंदे १७६, विजय हणमंत भांडवलकर १७०, उत्तम आगतराव कोकरे १६८.

महिला राखीव मतदार संघातील ३३१ वैध मतांपैकी २१४ मते घेऊन संगीता बापूराव सोनवलकर आणि १९५ मते घेऊन सुरेखा भीमराव सोनवलकर विजयी झाल्या आहेत.

अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघातील ३३३ वैध मतांपैकी २०६ मते घेऊन अशोक नारायण कचरे, विमुक्त जाती भटक्या जमाती राखीव मतदार संघातील ३३२ वैध मतांपैकी १९७ मते घेऊन मोहन शिवाजी सोनवलकर आणि इतर मागास वर्ग राखीव मतदार संघातील ३३४ वैध मतांपैकी १९२ मते घेऊन लक्ष्मण शिवराम नाळे विजयी झाले आहेत.

विजयी झालेल्या राजे पॅनेलला जगन्नाथ सोनवलकर, अहमद शेख, रघुनाथ सोनवलकर, तानाजी सोनवलकर, सुदाम शिंदे, हनुमंत शिंदे, ज्ञानेश्वर बोराटे, दशरथ नाळे, हनुमंत सोनवलकर, अशोक सोनवलकर, बापूराव सोनवलकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी धोम – बलकवडीचे पाणी आणल्याने तिरकवाडी गावात ऊसाचे क्षेत्र खूप वाढले आहे. या निवडणूकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरला असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी श्रीमंत रामराजे यांच्या निष्ठावंतांचे राजे पॅनेल सोसायटीच्या सर्व सभासदांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. राजे पॅनेलचे नेतृत्व माजी उपसरपंच महेश सोनवलकर यांनी केले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जयभवानी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष आनंदराव शितोळे यांच्यासह अनेकांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले असून राजे गटाचे कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींचे आभार मानले आहेत.

या पॅनेलच्या विजयासाठी शिरीष सोनवलकर, गजानन शिंदे सर, आनंदराव सोनवलकर सर, श्रीहरी भिसे, रमजान पठाण, वैभव सोनवलकर, अरविंद सोनवलकर, विलास सोनवलकर, राजाभाऊ सोनवलकर, प्रमोद सोनवलकर, श्रीकांत शिंदे, पंकज शिंदे, दस्तगीर शेख, भरत पवार, शुभम पवार, संतोष भिसे, दत्ता पिसे, रविंद्र सोनवलकर, सागर खरात, विकास सोनवलकर, रणजित भांडवलकर, रंगनाथ आडके, शंकर शिंदे, बापुराव कचरे यांनी परिश्रम घेतले.

सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण कार्यालयातील सहकार अधिकारी शेखर साळुंखे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.


Back to top button
Don`t copy text!