दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
गोखळी गावाचे रत्न तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल जगताप यांनी मंगळवारी राजे गटातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी गोखळीचे माजी सरपंच मनोज गावडे, युवा नेते विजय कदम, युवा नेते सुशांतभैया निंबाळकर, युवा नेते शिवसेना तालुका अध्यक्ष नानासो इवरे, पिंटू जगताप व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. त्याबाबत त्यांनी पक्षाकडे आपला इच्छुक उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला हातो. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही.
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात प्रा. अनिल जगताप यांनी कामकाज केले असून सन १९९७ साली ते आसू – गुणवरे गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यांचा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे.