उत्तर कोरेगाव भागातील नांदवळ व घिगेवाडी येथे राजे गटाला धक्का


दैनिक स्थैर्य । 15 जुलै 2025 । फलटण । उत्तर कोरेगाव भागातील नांदवळ व घिगेवाडी येेथील राजे गटाचे कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई येथे आमदार सचिन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे उत्तर कोरेगाव भागात राजे गटाला धक्का बसला आहे.

उत्तर कोरेगाव भागातील नांदवळच्या (ता. कोरेगाव) सरपंच सौ.अरुणा बेस्के, उपसरपंच सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश रासकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता भोसले, ग्रामपंचायत सदस्य सौ.जयश्री भोसले, ग्रामपंचायत सदस्य सौ पुष्पा पवार, तसेच नांदवळ विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सूर्यकांत पवार, संचालक दत्तात्रय पवार, संचालक दत्तात्रय बबन पवार,

संचालक रघुनाथ पवार, संचालक अभिमन्यू भोसले तसेच घोगवडी गावचे सरपंच नारायण सावंत, माजी सरपंच आदिनाथ सावंत व घिगेवाडी विकास सहकारी सोसायटी चे चेअरमन धनसिंग सावंत, व्हाईस चेअरमन भरत घिगे व लक्ष्मण सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राजे गटाला राम राम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजितदादा पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी पिंपोडे सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत निकम, प्रवीण निकम आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!