
दैनिक स्थैर्य | दि. २२ मार्च २०२५ | फलटण | तालुक्यातील कोळकी जिल्हा परिषद गटातील महत्त्वाचे गाव असणाऱ्या राजुरी गावांमध्ये राजे गटाला खिंडार पडले असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे.
यावेळी स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, युवा नेते संतोष गावडे पाटील यांच्यासह बरड पंचायत समिती गणा मधील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी प्रवेश करत असताना माजी खासदार रणजीत सिंह म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी कामकाज करणे आवश्यक आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहे.
यावेळी राजुरी विकास सोसायटीचे संचालक योगीराज साळुंखे, भूविकास बँके कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी. एन. गावडे, संभाजी पवार, संदीप हगारे, सोमनाथ गावडे, सुरेखा गावडे, विद्या बागल, राजेंद्र साळुंखे, बाळासाहेब हगारे, रंगनाथ पवार, भानुदास पवार, अर्जुन हगारे, अनिल गावडे, दादासाहेब रणदिवे, भानुदास गावडे, अनिल खलाटे, सागर पवार, नवनाथ पवार, नितीन पालवे, बाबुराव पवार, परशुराम पवार, संदीप साळुंखे, अमोल पोळ, संजय साळुंखे, राजेंद्र बागाव, राजेश पोळ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.