दुधेबावीच्या विकासासाठी राजे गट कटिबद्ध : श्रीमंत रघुनाथराजे; दुधेबावीत दिपक चव्हाणच आघाडी घेणार असल्याचा विश्वास


दैनिक स्थैर्य | दि. 18 नोव्हेंबर 2024 | दुधेबावी | दुधेबावीचे नेते माणिकराव आम्हाला सोडून गेल्यानंतरही गावकऱ्यांनी या पडीच्या काळात आम्हाला साथ दिलेली आहे. भिसे वस्ती येथील रस्त्याचे काम, सभा मंडपाचे काम, स्मशान भूमिचे काम, तलावात पाणी सोडण्याचे काम ही सर्व कामे आपण प्राधान्याने करणार आहोत. आगामी काळात आमच्या कुटूंबातील श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत विश्वजितराजे ही तरुण मंडळी कायम तुमच्या सोबत राहणार आहेत. आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दुधेबावी गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपक चव्हाण यांना आघाडी मिळणार असल्याचा विश्वास सुद्धा यावेळी श्रीमंत रघुनाथराजे यांनी यावेळी व्यक्त केला.

दुधेबावी ता. फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ कोपरा सभेत श्रीमंत रघुनाथराजे बोलत होते. यावेळी बाबुराव नाळे, भाऊ ठोंबरे, सुरेश नाळे, राजेंद्र चांगण, दादासाहेब सोनवलकर, राजेंद्र सोनवलकर, भाऊसाहेब मोरे, सागर भिसे, विकास सोनवलकर, योगेश दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!