अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी राजावाडी हॉस्पिटल सुसज्ज करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२३ । मुंबई । राजावाडी हॉस्पिटल सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी युक्त व कॅशलेस रुग्णालय करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मेघदूत निवासस्थान येथे घाटकोपर पश्चिम येथील रायफल रेंज व राजावाडी हॉस्पिटल संदर्भात बैठक झाली. यावेळी आमदार राम कदम, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, घाटकोपर येथील रायफल रेंज परिसरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करण्यासंदर्भात मागणी असून यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान, रायफल रेंजसाठी पर्यायी जागेची पाहणी पोलिस विभागाने करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

घाटकोपर पश्चिम येथील रायफल रेंज परिसरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, थीम फॉरेस्ट, कृत्रिम तलाव तसेच हा परिसर रमणीय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रकल्प तयार करता येईल. यासाठी रायफल रेंज पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. राजावाडी हॉस्पिटल नव्याने बांधण्याची आवश्यकता असल्याची सूचनाही आमदार श्री. कदम यांनी मांडली.


Back to top button
Don`t copy text!