दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । फलटण । आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाधीश लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची सोनगाव येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली तसेच सोनगाव गावच्या जडणघडणीतील महत्वपूर्ण व्यक्तिमत्त्व, समाजगौरव, राजकारणातील आदर्शवत व्यक्तिमत्त्व, तरुणांचे प्रेरणास्थान ,सोनगाव चे मा.सरपंच व विद्यमान सदस्य मा श्री पोपटराव गुलाबराव बुरुंगले (आबा) यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती व सोनगाव मा सरपंच पोपटराव बुरुंगले आबा यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा असा दुग्ध शर्करा योग असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन सोनगावच्या सर्व तरुण मंडळा कडून करण्यात आले होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रात सोनगाव चे ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिर परिसरात पवित्र मानल्या जाणाऱ्या पिंपळ या वृक्षाचे झाड लावण्यात आले ,यातून निसर्ग व गाव सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न शील राहिले पाहिजे असा संदेश देण्यात आला. सोनगाव च्या तरुण मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी व्हॉलीबॉल चे साहित्य भेट म्हणून देण्यात आले त्याचे ही उदघाटन आबा व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
तसेच संध्याकाळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व मा श्री पोपटराव बुरुंगले यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये राजाळे गावचे मा. सरपंच संभाजी निंबाळकर, श्री नीलकंठ निंबाळकर सर, श्री श्रीमंत निंबाळकर साहेब , श्री महावीर भालेराव, श्री हनुमंत थोरात , श्री रमेश जगताप यांनी छ.शाहु महाराज व पोपटराव बुरुंगले यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा श्री राजेश निकाळजे यांनी केले. याप्रसंगी गावातील आजी माजी सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , सर्व प्रतिष्ठित मान्यवर , ग्रामस्थ, तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .