दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । आटपाडी । सांगली जिल्ह्यातील युवकांना माहिती तंत्रज्ञानाच्या आधाराने नवीन उद्योग उभा करून त्यांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आधुनिक युगाचा जिल्ह्याचा विकास घडवून पाहणारा युवक नेता म्हणून प्रतीक दादा पाटील यांचा उल्लेख करावा लागेल अशा शब्दात आटपाडी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज पाटील यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला श्री प्रतीक दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामबापू हायस्कूल वर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याच्या समारंभामध्ये ते बोलत होते ते पुढे म्हणाले प्रत्येक दादा पाटील हे अत्यंत सुसभावी मित्तभाषी व नम्र प्रवृत्तीचे युवक नेते असून स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाण्याची परंपरा त्यांनी जपली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांचे ते चिरंजीव असले तरी त्यांचे आजोबा लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारावर त्यांची आढळ श्रद्धा आहे त्यामुळे त्यांच्या रूपाने इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही जयंतराव पाटील यांच्या कर्तुत्वाचा त्यांना जरूर अभिमान आहे पण केवळ त्यांच्या वारशावर समाजापुढे जाणे त्यांना पसंत नाही ज्या कष्टाने जयंतराव पाटील यांचे नेतृत्व घडले त्याच विचाराने आपलेही नेतृत्व घडावे यासाठी त्यांची कष्ट करण्याची तयारी आहे त्यामुळे प्रतीक दादांच्या रूपाने एक दमदार युवक नेता सांगली जिल्ह्यामध्ये तयार होत आहे याचा आम्हा युवकांना अभिमान आहे अशा या प्रतीक दादांना आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.
या प्रसंगी कामत गावचे सरपंच परशूराम सरक , राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड , युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस नितीन डांगे, तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष दिपक पाटील, युवा नेते सागर डोईफोडे, अमित मोरे , आशिष जाधव उपस्थित होते. यावेळी स्वागत महादेव देवकर सर यांनी केले तर संतोष पाटील यांनी आभार मानले.