अवकाळीने जिल्ह्यात पाच कोटींचे नुकसान

मान्सूनपूर्व आराखड्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा


दैनिक स्थैर्य । 24 मे 2025। सातारा । जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला मान्सूनपूर्व आराखडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच अवकाळी ने सातारा जिल्ह्याला असा तडाखा दिला की आराखडे सादर करायला वेळच मिळाला नाही. तीन दिवसांच्या पावसाने सातारा शहरासह जिल्ह्यात तब्बल साधारण पाच कोटी रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे जिल्हा प्रशासनाने अद्याप त्याला दुजोरा दिला नसला तरी निसर्गाची छेडछाड झाल्यावर काय नुकसान होते याचा प्रत्यय सातारा वासियांना आला आहे

दरड प्रवण आणि पूरप्रवण क्षेत्रांच्या संदर्भामध्ये आपत्ती व्यवस्थापनाला सूचना दिल्या. धोकादायक होर्डिंग फ्लेक्स तातडीने उतरवणे, धोकादायक इमारतींना नोटिसा बजावणे, त्या त्या कार्यक्षेत्रात तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे करून संबंधितांना त्यांचा इशारा इत्यादी कामे निर्देशित केली होती मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच अवकाळी चा तडाखा बसून जिल्ह्यामध्ये साधारण 5 कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.जिल्ह्यामध्ये यंदा गेल्या पाच वर्षात प्रथमच मान्सूनपूर्व अवकाळी सातारा जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. पुढील 72 तास हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. पुणे वें गलोर महामार्गावर जोरदार पावसामुळे महामार्गावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होणे किंवा वाहने पाण्यात बुडून इंजिनचे नुकसान होणे असे अनेक प्रकार घडले आहेत.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. कमी दाबाच्या चक्रीय पट्ट्यांमुळे सातत्याने पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पाऊस पडत आहे. त्यामुळे फळबागा तसेच खरीप पिकांच्या शेतकर्‍यांच्या तयारीला चांगलाच फटका बसला आहे. पुढील तीन दिवस पाऊस कायम राहिल्यास जमिनीमध्ये ओल तयार होईल. मात्र, पेरणीपूर्व मशागतीची कामे मात्र अडचणीत आली आहेत. माण तालुक्यातील मार्डी परिसर तसेच खटाव तालुक्यातील फळबागांचे सुद्धा साधारण 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व उपविभागातील तहसीलदारांना पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश यापूर्वी दिलेले आहेत. कोयना व पाटण कराड बासारख्या पूरक्षेत्र भागामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या साधनांचापुरवठा करण्यात आला आहे प्रात्यक्षिक प्रशिक्षण करण्यापूर्वी प्रत्यक्ष पावसाने कार्यानुभव पूर्ण दिल्यामुळे सर्व कर्मचार्‍यांची पळापळ झाली आहे. कास तलावाला सुद्धा या पावसामुळे तीन फूट पाणी पातळी अधिक मिळाली आहे. तर कोयना धरणात तब्बल 16 टीएमसी पाणी वाढले आहे. जिल्हाधिकार्‍यांना मान्सूनपूर्व आराखड्यांचे अंदाज घेणे व तत्सम कारवाई करण्यापूर्वीच झालेल्या नुकसानीचे आढावे घेण्याची वेळ आली आहे.

ओढ्याचा गळा आवळल्याने पाणी घरात गोडोली कामाठीपुरा व रामराव पवार नगर येथे रुंदावलेल्या पात्रातून ओढ्यातील पाणी लोकांच्या घरामध्ये शिरण्याचे प्रकार घडले. साईबाबा मंदिर परिसरामध्ये बेकरी व घरांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे बुकसान झाले आहे. गोडोली येथील शिवनेरी कॉलनी मध्ये सुद्धा पाणी घरात घुसून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याच्या तक्रारी बागरिकांनी केल्या आहेत. याबाबतच्या लेखी तक्रारी सातारा पालिकेकडे दाखल झाल्या आहेत. पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सध्या रस्त्यावरील माती काढण्यात गुंतला आहे. शहरातील मुख्य सात ओढे आणि अन्य पाण्याचे प्रवाह त्यांची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे सध्या तरी ओढ्यांनी रस्त्यावर नवीन टाकलेली वाळू व माती हटवण्याचे काम सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!