
दैनिक स्थैर्य । 27 जून 2025 । सातारा । कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाने हजार मिलिमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद 31 हजार 252 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनीत्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.
धरणातून सोडलेले पाणी व कोयना नदी क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे अनेक ठिकाणी कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील गावे, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. सध्या कोयना धरणात एकूण 40.94 टीएमसी उपलब्ध तर 35.94 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. संध्याकाळी या चोवीस तासात व एक जूनपासून आत्तापर्यंत कोयनानगर येथे 93 मि.मी. (1004 ), नवजा 102 मि.मी. (1014) तर महाबळेश्वर 125 (1001) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच काळात धरणातील पाणीसाठ्यात 2.70 टीएमसीने वाढ झाली आहे.