
स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : फलटण शहर आणि तालुक्यात आजही (दि. २८ सप्टेंबर) पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार, आज सकाळच्या सत्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहील.
काल, शनिवारी फलटण परिसरात ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला होता. आज दिवसभराचे कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस (७७°F) तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस (७२°F) राहण्याचा अंदाज आहे.
सततच्या पावसामुळे नागरिकांनी, योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.