
दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । सातारा । सातारा कास रस्त्यावर वनविभागाची गस्त वाढवावी वनव्यवस्थापन समित्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे, याकरिता सातारा वनविभागाच्या वतीने कासची नाईट सफारी सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून कास धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे ही नाईट सफारी सध्या तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली आहे.
कास पठार व परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. तेथील वृक्षतोड थांबावी शिकारीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असतात येथे गस्त घालण्याचे प्रमाण वाढावे व वनव्यवस्थापन समितीला उत्पन्न मिळावे या हेतूने काच जंगल सफारी सुरू करण्यात आली. या सफारीवर अनेक पद्धतीची टीका झाली पर्यावरणवाद्यांनी या नाईट सफरीला विरोधही केला मात्र गेल्या तीन महिन्यांमध्ये जवळ साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या ही नाईट सफारी पावसाचा जोर वाढल्यामुळे बंद करण्यात आले आहे. रात्री आठ ते अकरा या कालावधीत पर्यटकांना वनविभागाच्या गाडीतून तीन तासाची राईड करण्यात येते हा उपक्रम सुरू झाल्यानंतर मे महिन्यात पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला जून महिन्यातही पर्यटकांनी या जंगल सफारीचा आनंद घेतला.
मात्र पावसाचा जोर आणि परिसरातील गाव यांचा वाढता वावर यामुळे सध्या याचा पहिला ब्रेक देण्यात आला आहे. पावसाळी वातावरणात पर्यटकांची गैरसोय होऊ नये तसेच इतर काही गोष्टी घडू नयेत, याकरिता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले पावसाळा सुरू होणार आहे. हिवाळ्याच्या प्रारंभी या जंगल सफारीचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनाची प्रतीक्षा करावी, लागेल असे महादेव मोहिते यांनी सांगितले.