
दैनिक स्थैर्य । दि. २० ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा शहर परिसरात विविध दोन ठिकाणी असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून तिघांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुजीत रघुनाथ (वय 45, रा. प्रतापगंज पेठ), चंद्रमणी आगाने (रा.कोडोली), राज किशोर हरीश्चंद्र (वय 21, रा.पुसेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांकडून पोलिसांनी 3700 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई राधिका रोड व अजंठा चौक परिसरात केली आहे.