जिल्ह्यातील तीन दारू अड्ड्यांवर छापे


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील तीन ठिकाणच्या दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वर्धनगड तालुका खटाव गावच्या हद्दीत हॉटेल रानमळा च्या आडोशाला तेथीलच हणमंत रामभाऊ माने वय 53 हे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून अकराशे चाळीस रुपयांच्या देशी दारूच्या सीलबंद बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या घटनेत नवीन गावठाण बावधन, तालुका वाई गावच्या हद्दीत बाळू अंकुश जाधव वय 30 यांच्याकडून 1820 रुपये किंमतीच्या 26 देशी दारूच्या सीलबंद बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

तिसऱ्या घटनेत हिंगणे, तालुका खटाव गावच्या हद्दीत विनायक काकड्या काळे हा त्याच्या घराच्या आडोशास दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 660 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!