दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील तीन दारु अड्ड्यांवर छापे टाकून संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जकातवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत बोगदा ते जकातवाडी जाणाऱ्या रोडवर बोगद्या नजीक असणाऱ्या गणेश पान शॉप च्या पाठीमागे आडोशाला जितेंद्र हनुमंत जाधव वय 43, रा. आनेवाडी, ता. जावळी हा अवैधरीत्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 840 रुपयाच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत वाटर कॉलनी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील मोकळ्या शेडमध्ये तेथीलच दत्तात्रय गुंडूराम जाधव वय 45 याच्याकडून दोनशे रुपये किंमतीची ताडी हस्तगत करण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेत वडजल, ता. माण गावच्या हद्दीत म्हसवड ते मायणी रस्त्यावरील निसर्ग ढाब्याच्या आडोशाला दशरथ यशवंत काटकर हा अवैध दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 980 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.