
दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापे टाकून ५ हजार ६७० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ललगुण, ता. खटाव गावच्या हद्दीत बुध ते फलटण जाणाऱ्या मार्गावर एका हॉटेलच्या आडोशाला तेथीलच दत्तात्रय भानुदास काटकर याच्याकडून १ हजार ५४०, काळेवाडी फाटा, ता. पाटण येथे अशोक तुकाराम निगडकर रा. रामिष्टेवाडी, ता. पाटण याच्याकडून ७७० रुपये, कोरेगाव, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत आझाद चौक परिसरात अनिल मानसिंग येवले राहणार शेंदुजर्णे, ता. कोरेगाव याच्याकडून ३ हजार ३६० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.