
स्थैर्य, सातारा, दि.२४: सातारा शहर पोलिसांनी 501 पाटी परिसर आणि महामार्गानजिक सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापे टाकून 6 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 501 पाटी परिसरातील तेली खड्डा येथे छापा टाकला. याठिकाणी मटका घेणार्या किरण रवींद्र तपासे, अमित वायदंडे दोघे रा. गुरुवार पेठ सातारा आणि मालक समीर कच्छी रा. मोळाचा ओढा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 1590 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, प्रीती हॉटेलमागे एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी मटका घेणार्या ईश्वर चंद्रकांत घोरपडे रा. कोरेगाव, चंदू चोरगे रा. रविवार पेठ, सातारा यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून 1150 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.