दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्डयावर कारवाईचा धडका सूरू आहे. या कारवाईतून मुद्देमाल हस्तगत करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील पंताचा गोट येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर शहर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सत्यम वाघ(वय 27, रा. कोडोली), सुशांत ढवळे यांच्यावर कारवाई करत 600 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शिवराज पेट्रोल पंपाच्या समोरील पत्र्याच्या आडोश्याला सूरू असलेल्या जुगार अड्डयावर शहर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी नितीन बाळकृष्ण जगदाळे(वय 32, रा. नांदगाव ता. सातारा) व अक्षय साळुंखे(रा. सत्वशिलनगर सातारा) यांच्यावर कारवाई करून 370 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. अशीच कारवाई शाहूपुरी पोलिसांनी केली आहे. जुनामोटार स्टॅड मंडई परिसरातील गणपती मंदिराच्या पाठीमागील बोळात जुगाराचा खेळ सुरू होता. यांची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सादीक आयुब सय्यद(वय 39, गुरूवार परज सातारा), चंद्रमणी आगाणे(रा. गोडोली) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून 2 हजार 302 रूपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख हस्तगत केली आहे.