सातार्‍यात दोन जुगार अड्ड्यावर छापा चौघांवर गुन्हा; चार मोबाईल, रोकड जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१: सातारा पोलिसांनी शहर परिसर आणि आजूबाजूच्या ठिकाणी चोरी-छुपे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकला असून यापैकी एक कारवाई सातारा शहर तर दुसरी कारवाई शाहूपुरी पोलिसांनी केली असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनाही प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. दोन्ही कारवाईत चार मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथील आयसीआयसीआय बँक परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून 1 हजार 160 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य, मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी नीलेश चंद्रकांत कांबळे (वय 34, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) आणि समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

शाहूपुरी पोलिसांनी अर्कशाळा परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अशोक काळे आणि आण्णा चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याबाबत शाहूपुरी पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, गेंडामाळ नाका ते गडकर आळी जाणार्‍या पूर्व बाजूस असणार्‍या अर्कशाळेच्या वॉलकंम्पाऊंडच्या लगत असलल्या पानटपरीच्या आडोशाला जुगार अड्डा सुरु होता. पोलिसांना याची माहिती मिळताच तेथे छापा टाकण्यात आला असून याप्रकरणी अशोक दिनकर गोळे (वय 48, रा. 651, मंगळवार पेठ, सातारा) आणि आण्णा चव्हाण (रा. तेलीखड्डा, शनिवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 हजार 45 रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत.


Back to top button
Don`t copy text!