फलटण तालुक्यात तीन जुगार अड्डयावर धाडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील मुंजवडीत एकाच ठिकाणी असलेल्या तीन वेगवेगळ्या अवैध हातभट्टी दारू अड्डय़ावर छापा टाकून फलटण पोलिसांनी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व हातभट्टी दारू असा 3 लाख 14 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की, फलटण तालुक्यातील मुंजवडी येथील भिवरकरवस्ती पैलवान बाबा मंदिराच्या शेजारील ओढ्याशेजारी एकाच ठिकाणी असलेल्या तीन वेगवेगळ्या हातभट्टी दारू अड्डयांवर दिनांक 30 रोजी छापा टाकून वसंत नारायण पवार (वय 70) शंकर राजेंद्र मसुगडे (वय 23), मनोज विजय पाटोळे (वय 25) सर्व रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांच्याकडे 1 लाख 89 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल तसेच अर्जुन छगन जाधव (वय 25), रा. हणमंतवाडी, ता. फलटण यांच्याकडे 50 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल, संगीता बल्या भोसले (वय 45) रा. मुंजवडी, ता. फलटण यांच्याकडे 70 हजार 800 रुपयांची बेकायदेशीर हातभट्टीसह इतर साहित्य आढळून आले.

यामध्ये 50 लीटर तयार झालेली हातभट्टी दारू, 2200 लीटर हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, बाभळीची साल, पातळ गूळ, खराब बॅटरी, गॅस सिलेंडर इत्यादी साहित्य असा एकूण 3 लाख 14 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे, दराडे, पोलीस उपनिरीक्षक अरगडे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!