दैनिक स्थैर्य | दि. ३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सांगवी (ता. फलटण) गावच्या हद्दीत नदीच्या पुलाशेजारी असलेल्या झाडाच्या आडोशाला मटका जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून २ हजार ७५ रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे.
या प्रकरणी सुनील उदयसिंह तावरे (वय ५४, रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) व बापू पांडुरंग वाघ (रा. सांगवी, ता. फलटण) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार ओंबासे करत आहेत.