
स्थैर्य, सातारा, दि.०७: निसराळे फाटा (ता. सातारा) येथील गावच्या हद्दीत पत्राशेडच्या मागे विनापरवाना ताडी व देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र किसन सूर्यवंशी (वय.३१ रा.घाणव (तामकणे) ता. पाटण) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या घटनेत एक लिटरच्या २७ ताडीने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या व देशी दारूच्या १२ बाटल्या असा सुमारे १,९७४रुपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ.सागर वाघ व पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबा महाडिक, पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोये, महिला पोलीस तेजस्विनी जाधव(जगताप) यांनी केली. या घटनेचा अधिक तपास बाबा महाडिक करत आहेत.