स्थैर्य, वडूज, दि.२४: अंबवडे ता. खटाव येथील अवैध वाळू उपसा अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करून 70 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबवडे तलाठी अक्षय साळुंखे यांनी 13 जणांवर वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी अंबवडे ता खटाव येथील येरळ नदी पात्रातील येरळा धरणाच्या भरावा लगत हेमंत गोडसे, सूरज पवार, महेश पवार, मिथुन राठोड, सुधीर गोडसे, पैलवान अमोल फडतरे, पैलवान मंगेश फडतरे व इतर दोन ते तीन लोक यांनी धैर्यशील पाटील, सूरज पाटील, सौरभ जाधव, यांच्या सांगण्यावरून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता जेसीबी, डंपर, ट्रॅक्टरच्या साह्याने अवैध वाळू उपसा करून चोरी करत असताना 70 लाख 95 हजार रुपयांच्या किमतीचा माल त्यांच्या कडे मिळून आला. तसेच पंकज साळुंखे, संग्राम गोडसे, बबन सावकार यांनी महसूल व पोलीस प्रशासनाचे हालचालीवर लक्ष ठेवून नमूद आरोपीस वाळूची चोरटी वाहतूक करण्यासाठी मदत केली.
याबाबतची फिर्याद तलाठी अक्षय साळुंखे यांनी वडूज पोलिसांत दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करीत आहेत.