दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२३ | फलटण |
खामगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत साखरवाडी ते मुरूम रस्त्यावर एका घराच्या आडोशाला २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हातभट्टीची बनावट देशी दारूसह एकूण ५१० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संदीप केज राठोड (वय १८, रा. खामगाव, ता. फलटण) याच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहा. फौजदार हांगे करत आहेत.