
दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२५ | फलटण |
मलवडी (ता. फलटण) गावातील रज्जाक हिराभाई सय्यद यांच्या घराच्या आडोशाला फलटण ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तीन पानी जुगार खेळत असलेल्या सहाजणांवर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ८६ हजार ६३० रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला.
या छाप्यात रज्जाक हिराभाई सय्यद (वय ५०), तात्याबा सखाराम सूळ (वय ३३), नीलेश बापू टकले (वय २८), विजय बळीबा तरडे (वय ३२, सर्व रा. मलवडी), सतीश सायबू चव्हाण (वय ३५, रा. वडगाव, ता. फलटण) व संजय यशवंत टकले (रा. मलवडी) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.