जुगार अड्ड्यावर छापा


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा शहर पोलिसांनी गुरुवार परजावर सुरु असलेल्या एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पंधरा हजारांचा ऐवज जप्त केला असून यामध्ये जुगार साहित्य, रोकड आणि चा मोबाईलचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांवर कारवाई केली आहे. राजेश संपतराव कदम (रा. पिलेश्वरी नगर, सातारा), महेंद्र बजरंग बोराटे (रा. करंजे पेठ, सातारा), सचिन नारायण कांबळे (रा. गुरुवार पेठ, सातारा), मधुकर दादू घाडगे (रा. दुर्गा पेठ, सातारा), कृष्णा यशवंत शेटे (रा. करंजे, सातारा), यशवंत नारायण घोरपडे (रा. करंजे पेठ), किसन विष्णू देवरुख (रा. सांबरवाडी, ता. सातारा), मनोज मल्हारी शेलार (रा. मल्हारपेठ, सातारा) आणि दिलावर मोहिद्दीन शेख (रा. गुरुवार पेठ) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!