दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | सातारा | सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने काल दिवसभरात शहराच्या विविध भागात छापे टाकत सुमारे २० हजारांची रोकड जप्त करत चौदा जणांवर गुन्हा नोंदविला. गुन्हा नोंद असणाऱ्यांमध्ये कालच तडीपार केलेल्या समीर कच्छी याचाही समावेश आहे.
गोडोली येथे छापा टाकत सातारा शहर पोलिसांनी जोतीराम कृष्णा कारंडे, सचिन कृष्णा देशमुख (रा. सिध्देश्वर कुरोली), वसीम इब्राहिम शेख (रा. शनिवार पेठ,सातारा), मधुकर काकासो माने (रा. लिंबाचीवाडी, ता.सातारा), अतुल बबन पार्टे (रा. आष्टे, ता.सातारा), सचिन कृष्णा शिंदे (रा. शनिवार पेठ, सातारा), भावेत संपत कुचेकर (रा. सुरुर, ता.वाई), कटप्पा साईबन्ना इंगळे (रा. कोडोली) याच्यासह समीर सलीम कच्छी ( रा. मोळाचा ओढा) यांच्यावर गुन्हा नोंद केला. पोलिसांनी याठिकाणाहुन १० हजार ४०० रुपयांची रोकड आणि मटक्याचे साहित्य जप्त केले.
शाहूपुरी पोलिसांनी राजधानी टॉवरजवळ छापा टाकत १ हजार २०० रुपयांची रोकड आणि साहित्य जप्त केले. याप्रकरणी सागर जयसिंग भोसले (रा. केसरकर पेठ, सातारा),यासिन शेख (रा.गुरुवार परज) याच्यासह तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच परिसरातील राजाज्ञे चौकात छापा टाकत शाहूपुरी पोलिसांनी ८ हजारांची रोकड आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी विक्रम बाळकृष्ण दुबळे (रा. मंगळवार पेठ,सातारा) आणि यासिन शेख (रा. गुरुवार पेठ,सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.