निनाम येथे चोरट्या दारू अड्ड्यावर छापा


 स्थैर्य, नागठाणे, दि. १८ : निनाम(ता.सातारा) येथे चोरटी दारू विक्री करणाऱ्या इसमास बोरगाव पोलिसांनी छापा टाकून पकडले. सागर चंद्रकांत महाडिक (वय.२९,रा.निनाम,) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. येथील ज्योतिर्लिंग मंदिराजवळ असलेल्या एका घराच्या आडोश्याला एकजण चोरून दारू विकत असल्याची माहिती सपोनि डॉ. सागर वाघ यांना मिळाली. यावेळी हवालदार सुनील जाधव, विशाल जाधव, विजय साळुंखे, प्रकाश वाघ, अमित पवार व चालक कपिल टीकोळे यांनी दुपारी निनाम येथे छापा टाकून सागर महाडिक याला रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळून सुमारे ३४८४ रुपये किमतीच्या ६७ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामचंद्र फरांदे करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!