
दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । सातारा । नागठाणे- कोपर्डे (ता.सातारा) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी कारवाई केली.तेथून सुमारे ३ हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त केली.कोपर्डे येथील ए वन चिकन सेंटरच्या आडोश्याला देशी दारू विक्री होत असल्याची माहिती मंगळवारी सपोनि डॉ.सागर वाघ यांना समजली होती.यावेळी हवालदार पी.पी.शिंदे,राहुल भोये व होमगार्ड हनुमंत लोहार यांनी तेथे कारवाई केली.घटनास्थळावरून शिकुर इब्राहिम ईनामदार(वय.४१,रा.बेघर वस्ती,कोपर्डे,ता.सातारा) याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून ९० मि. लीच्या सुमारे ३ हजार रुपये किमतीच्या १०० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.पुढील तपास हवालदार पी.पी.शिंदे करत आहेत.