स्थैर्य, सातारा, दि. 1 : तरडफ, ता. फलटण येथे तीन पानी जुगार चालणार्या अड्ड्यावर सातारा एलसीबीने छापा टाकून 13 जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त ककरण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, तरडफ येथे काहीजण तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दि. 1 रोजी त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी 13 जण पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटार सायकल व जुगार साहित्य असा सुमारे 2 लाख 70 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल हस्तत करण्यात आला आहे. संबंधित 13 संशयीतांना पुढील कारवाई करीता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपूते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील सातारा यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, जोतीराम बर्गे, पोहवा विनोद गायकवाड, पोना योगेश पोळ, राजकूमार ननावरे, पोशि केतन शिंदे यांनी सहभाग घेतला.