मंगळवार पेठेमध्ये जुगार अड्ड्यावर छापा


दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या विश्वेश्वर चौकात एका इमारतीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी रमेश कालीदास धुमाळ (वय ५८, रा. ५0७, मंगळवार पेठ, सातारा आणि त्याचे मालक राजू सांडगे (रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली असून या कारवाईत १ हजार १३२ रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. शाहूपुरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.


Back to top button
Don`t copy text!