
दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील अतित येथे सुरु असलेल्या जुगार अडड्ड्यावर छापा टाकून बोरगाव पोलिसांनी ९५५ रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी अरुण जगन्नाथ कुंभार (वय ४७, रा. अतित, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सीआपीसी अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. बोरगाव पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.