
स्थैर्य, फलटण, दि. ०१ : शहरातील कुरेशी नगर येथे शहर पोलिसांनी धाड टाकून तेथून तीन लाख ४५ हजार रुपये किंमतीची ११२ जनावरे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी इरफान याकूब कुरेशी रा. कुरेशी नगर, फलटण याच्या विरूध्द गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार दि. ३० एप्रिल रोजी पहाटे दोन च्या सुमारास कुरेशी नगर येथे धाड टाकली. यामध्ये पोलिसांनी दोन लाख १० हजार रुपये किंमतीची १०५ वासरे, एक लाख २० हजार रुपये किंमतीच्या सहा जर्सी गायी व पंधरा हजार रुपये किंमतीचा एक जर्सी खोंड असा एकूण तीन लाख ४५ हजार रुपये किंमत होणारी ११२ जनावरे ताब्यात घेतली. या प्रकरणी इरफान याकूब कुरेशी याच्या विरुध्द महाराष्ट्र पशू संरक्षण व पशू छळ अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल अच्यूत जगताप यांनी दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस अधिकारी एस एन भोईटे करीत आहेत.