फलटण बसस्थानकाच्या स्थानक प्रमुख पदी राहुल वाघमोडे


दैनिक स्थैर्य | दि. 22 डिसेंबर 2023 | फलटण | महाराष्ट्र राज्य परिवहनच्या फलटण आगाराच्या स्थानक प्रमुखपदी राहुल वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवाशी संघटने तर्फे अध्यक्ष प्रा. शिवलाल गावडे यांनी शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे याचां यथोचित सत्कार केला. यावेळी सहाय्यक वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे, काका नाळे, वाहक श्रीपाल जैन यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रवाशी संघटने तर्फे एस. टी. प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे शिवलाल गावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे यांनी यापुर्वी मध्यवर्ती कार्यालय, मुंबई तसेच धाराशिव विभागात परांडा आगाराचे आगार व्यवस्थापक पदी कामकाज केले आहे. फलटण आगारात कर्मचारी व प्रशासनाचा योग्य तो समन्वय ठेवुन तालुक्यातील प्रवाशांना तत्पर व जलद सेवा दिली जाईल; असे सत्कार प्रसंगी वाघमोडे यांनी मत स्पष्ट केले. बसेसच्या उप्लब्धतेनुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनखाली नवीन बसेसचे नियोजन करण्यात येणार आहे; असेही यावेळी वाघमोडे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!