
स्थैर्य, फलटण, दि. २३ नोव्हेंबर : फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३(क) मधील तिरंगी लढत दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत असून, या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) पक्षाचे उमेदवार राहुल निंबाळकर यांनी आपली प्रचारयंत्रण धारदार केली आहे. शांतपणे सुरुवात केलेल्या त्यांच्या प्रचाराला आता जबरदस्त गती मिळाली असून, त्यांनी मतदारांसमोर यापूर्वी केलेल्या कामांचा आणि पुढील विकास आराखड्याचा स्पष्ट हिशेब मांडायला सुरुवात केली आहे.
घरोघरी जाऊन मतदारांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांना झालेली कामे दाखवणे, प्रलंबित कामांवर स्पष्ट भूमिका मांडणे, आणि पुढील पाच वर्षांत काय काय करणार याची खणखणीत माहिती देणे—असा त्यांचा दैनंदिन प्रचाराचा कार्यक्रम सुरू आहे. विशेष म्हणजे, राहुल निंबाळकर यांच्या प्रचारात कोणतीही आंब्याला कोयी न ठेवता, स्पष्ट, सरळ आणि विकासकेंद्रित संवाद होत असल्याने मतदार त्यांच्याकडे गांभीर्याने पाहू लागले आहेत.
प्रभागात युवकांचा उत्साहही कमालीचा वाढला आहे. युवा मतदार खुलेआम सांगताहेत की, राहुल निंबाळकर यांच्याकडे ऊर्जाही आहे, उद्दिष्टही आहे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, काम करण्याची धमक आहे. सोशल मीडिया, पदभ्रमण, चौकसभांमध्ये तरुणाई सक्रीयपणे सहभागी होताना दिसते आहे. रोज सकाळपासून रात्रीपर्यंत प्रभागभर राहुल निंबाळकर यांचा फेरफटका सुरू असतो आणि मतदार त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत आहेत.
आपल्या संवादात ते सातत्याने सांगतात की, प्रभागातील सुरू असलेला विकास पुढे न्यायचा असेल तर शहराचा कारभार सक्षम नेतृत्वाकडेच हवा. त्यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी घड्याळाची साथ आवश्यक असल्याचे ते मतदारांना पटवून सांगत आहेत. युवक, महिला, जेष्ठ नागरिक—सर्व घटकांमध्ये राहुल निंबाळकर यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांपासून प्रभागाच्या समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती, सार्वजनिक सुविधांची वाढ या मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या दखलीमुळे मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत.
एकंदरीत, प्रभाग क्रमांक १३(क) मध्ये तिरंगी लढतीचे समीकरण जितके रंगतदार आहे, तितकाच राहुल निंबाळकर यांचा प्रचारही गतीमान आणि वजनदार होताना दिसतोय. विकासाचा हिशेब, स्पष्ट भूमिका आणि युवकांचा पाठिंबा ही त्यांची तीन मोठी जमेची बाजू मानली जात आहे. अखेर या प्रभागातील मतदार कोणाला कौल देतात, हे उलगडण्यासाठी सगळ्यांचे डोळे १३(क) कडे खिळून आहेत.

