राहुल खाडे यांची उपाध्यक्षपदी निवड


 

स्थैर्य, कातरखटाव, दी. 30 : एनकुळ (ता. खटाव) येथील राहुल सदाशिव खाडे यांची पिंपरी चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आ. महेशदादा लांडगे, आ. लक्ष्मणभाऊ जगताप, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाभाऊ खाडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोते उपस्थित होते. राहुल हे सदाभाऊ खाडे यांचे सुपुत्र आहेत. या निवडीबद्दल त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!