स्थैर्य, दि.१५: काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी आसामच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे शिवसागर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मोदी-शहा यांच्यावर निशाणा साधत ‘हम दो-हमारे दो’ असे म्हटले. राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते मंचावर ‘NO CAA’लिहिलेला गमछा घालून दिसले. राहुल गांधी म्हणाले, ‘हम दो-हमारे दो ऐका, काहीही होईल पण येथे CAA असणार नाही’
बरोबर एक आठवड्यापूर्वी नरेंद्र मोदींनी आसाम दौरा केला होता. त्यांनी सोनितपूरमध्ये एक सभा केली होती आणि म्हटले होते की, आमच्या सरकारने विकास केला. जुने सरकार आसामच्या अडचणी समजू शकली नाही. त्यांनी चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांसोबतही चर्चा केली होती आणि म्हटले होते की, येथील टी-वर्कर्सला बदनाम केले जात आहे. असे करणाऱ्यांना आसामची चहा पिणारा प्रत्येक हिंदुस्तानी उत्तर देईल.
द्वेष पसरवणाऱ्यांना जनता धडा शिकवेल
जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी आसाम फोडू शकेल. जर कोणी आसाम कराराला स्पर्श करण्याचा किंवा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला तर कॉंग्रेस पक्ष आणि आसाममधील जनता एकत्रितपणे त्यांना धडा शिकवतील. ‘हम दो-हमारे दो और बाकी सब मर लो’. ‘हम दो-हमारे दो और जो असम को चला रहे हैं। असम में जो कुछ भी है, उसे लूट लो।’ अशा घोषणाही राहुल गांधींनी दिल्या.
रिमोटने टीव्ही चालू शकतो, CM नाही
राहुल म्हणाले की रमोटवर टीव्ही चालू शकतो, मुख्यमंत्री नाही, तुमचे मुख्यमंत्री फक्त दिल्ली-गुजरातच ऐकतात. आसाममधील मुख्यमंत्री आसामचाच असला पाहिजे, जो आसामच्या लोकांसाठी काम करेल. सध्याच्या सरकारला हटवावे लागेल, कारण ते दिल्ली आणि गुजरातचेच ऐकतात.