राहिमतपुरचा वनपाल व महिला वनरक्षक 57 हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपतने केली शिकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. १९ : तक्रार दाराच्या शेतात तोडलेल्या 717 झाडांच्या लाकडाच्या वाहतुकीचा पास मिळऊन देण्यासाठी 57 हजार चारशे रुपयांच्या लाचेची मागणी करणारा वनपाल व महिला वनरक्षक सतारा लाच लुचपतच्या जाळ्यात रंगेहाथ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संदीप प्रकाश जोशी वय ३७, वनपाल, वनपरीमंडळ अधिकारी, रहिमतपूर ता. कोरेगाव जि. (सातारा वर्ग-3 )सध्या रा. रहिमतपूर ता.कोरेगाव जि. सातारा, नम्रता भुजबळ, वनरक्षक, नागझरी ता. कोरेगाव जि. सातारा रा.नागझरी ता. जि. सातारा याना लाच लुचपत विभागाने सापळा कारवाई करत रंगेहात पकडले. त्यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रहिमतपूर वनपरिमंडल कार्यालयातील खाबूगिरी लाच लुचपत विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के व पोनि अविनाश जगताप यांनी चव्हाट्यवर आणल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

या बाबत सातारा लाच लुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रार दाराच्या स्व मालकीच्या शेतामध्ये तोडलेल्या 717 झाडांच्या लाकडाच्या वाहतुकीसाठी पास मिळऊन देण्यासाठी तक्रारदाराला वनपाल व वनरक्षकांनी 57 हजार 400 रुपयाच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली होती, ता 18 जून रोजी या बाबत रहिमतपूर वनपरिमंडळात पडताळणी केल्यानंतर सापळा कारवाई करत लाचेची मागणी करणारे व ती स्वीकारताना वनपाल संदीप जोशी व वनरक्षक नम्रता भुजबळ यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा उप अधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप,

 पो.ना. विनोद राजे, प्रशांत ताटे, पो.कॉ.संभाजी काटकर, तुषार भोसले, म.पो.कॉ.शितल सपकाळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!