रागिनी फाऊंडेशनचा ‘रागिनी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ एप्रिल २०२२ । बारामती । येथील रागिनी फाऊंडेशनच्या वतीने आर्थिक ,सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य ,आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा ‘रागिनी सन्मान २०२२’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

हा पुरस्कार शाकिरा पट्टेकरी (कोल्हापूर),हिरकणी वाबळे, सुचेता हदंबर, उर्मिला इंगोले ,अंजली गोडसे, शितल रायते, सविता दूधभाते दुर्गाताई माने , संध्या काळे, जयश्री भोसले,डॉ.हिमगौरी वडगावकर, मंगलताई बोरावके, विजया चांदगुडे, उमा रासकर, वर्षाराणी जगताप, मीनल कुडाळकर, शिवगंगा शिंदे, डॉ. राजश्री नाळे, मीनाक्षी ढोले, अंजली गोडसे, डॉ, प्राची थोरात ,रेश्मा पुणेकर, स्वानंदी रथ, वर्षा शिंदे, श्रुती कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.

‘विविध क्षेत्रातील महिलांनी एकत्र येऊन, त्यांचे अनुभव सांगावेत व इतर महिलांनी प्रेरित व्हावे ही संकल्पना होती. महिलांच्या कार्यकर्तृत्वाला अधिक प्रोत्साहन मिळावे, त्यांची इतर क्षेत्रांविषयी महिलांना माहिती व्हावी हा उद्देश्य ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. असे रागिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता घाग यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. उपस्थित महिलांना अभिनय क्षेत्राबद्दल व स्वतःच्या प्रवासाबद्दल सांगितले. यावेळी पुरस्कारार्थी महिलांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ‘रागिनी चैत्रपालवी’ या डिजिटल विशेषकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

वनिता बनकर व प्रोफेसर डॉ.सीमा नाईक- गोसावी यांनी महिलांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.सर्व सन्मान स्वीकारणाऱ्या महिलांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी दिनकर आगम, प्राचार्य सिताराम गोसावी, सिकंदर पट्टेकरी, गणेश नेवसे, आयर्नमॅन सतीश ननवरे, प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. सुजित अडसूळ ज्ञानेश्वर रायते,प्रा.मनोज वाबळे, शुभांगी चौधर, रोहिनी बनकर, पायल नेवसे, कमलताई हिंगणे, आशा शिरतोडे, सुमन जाचक, धनश्री गांधी,नीता चव्हाण, नंदा भोसले, आरती गव्हाळे,योगिता पाटील ,स्नेहा गाढवे, कोमल बांदल यांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी प्रवीण वाघमारे,सिकंदर पट्टेकरी, शिवाजी एजगर, प्रशांत सातव, शिवानी घोगरदरे व रागिनी फाऊंडेशच्या सर्व सदस्यांचे योगदान लाभले. यावेळी गौरी डान्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी आपले विविध नृत्यप्रकार सादर केले.


Back to top button
Don`t copy text!