रा.ना. गोडबोले ट्रस्टतर्फे शैक्षणिक मदत


दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । सातारा । सातारा येथील ज्यॆष्ठ समाजसेवक स्मृतीशेष. रा.ना. गोडबोले यांनी स्थापन केलेल्या आणि गोडबोले कुटुंबियांनी वाढविलेल्या रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे गेली ५० वर्षे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाते. या वर्षीच्या सहाय्यासाठी करावयाच्या अर्जाचे फॉर्म्स आय.डी.बी.आय. ट्रस्टीशीप सर्व्हिसेस लि. विश्वस्त भवन, २१८, प्रतापगंज पेठ, एम. एस.ई.बी ऑफिस शेजारी, सातारा येथे रु.१/- या नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांनी ते पूर्ण भरून दि. ४  जुलै २०२२  पूर्वी तेथेच द्यावेत असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त अशोक गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले, अुदयन गोडबोले, प्रद्युम्न गोडबोले व डॉ. चैतन्य गोडबोले यांनी केले आहे. अर्जामध्ये मोबाईल नंबर नमुद करावा.

Back to top button
Don`t copy text!