क्विक हिलने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये मजबूत वृद्धी नोंदवली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १८: क्विक हिल टेक्नोलॉजीज लिमिटेड (क्विक हिल), भारतातील ग्राहक, बिझनेस, सरकारसाठी सायबर सिक्युरिटी आणि डेटा प्रोटेक्शन सोल्युशन्स प्रदान करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि एकूण वर्षातील निकालाचे ऑडिट केले. कंपनीने महसुलात ३,३३० दशलक्ष रुपयांची वाढ नोंदवली आहे जी वार्षिक स्तरावर १६.४% अधिक आहे. कंपनीचा ईबीआयटीडीए १,४१५ दशलक्ष रुपये झाला असून यात वार्षिक ५४.८% वृद्धी झाली आहे. कंपनीने कर पश्चात नफ्यात वार्षिक स्तरावर ४३.८% वृद्धी नोंदवली असून तो १,०७० दशलक्ष रुपये झाला आहे.

क्विक हिल टेक्नोलॉजीने कंपनीच्या पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या ९.८५ टक्के इक्विटी शेअर्स असलेल्या कंपनीच्या ६३,२६,५३० इक्विटी शेअर्स खरेदीची घोषणा केली आहे. याची एकूण रक्कम १५५० दशलक्ष रुपये, प्रति इक्विटी शेअर २४५ रुपये यापेक्षा जास्त नसावी. संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२१-२१ साठी प्रति शेअर १० रुपये फेस व्हॅल्युसह ४ रुपये प्रति शेअरचा लाभांश जाहीर केला. तो पुढील सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन आहे.

क्विक हिल टेक्नोलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. कैलाश काटकर म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२१ एका उच्चांकी स्थितीत समाप्त करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सिक्युरिटी सोल्युशन्स देण्यात आम्ही सातत्य राखले. यासाठी आमच्या कर्मचारी आणि भागीदारांची अखंड मेहनत आणि समर्पण आहे. नव्या क्षमता वाढवणे, स्थान व लीडरशीप मजबूत करण्यावर आमची पुढील गुंतवणूक असेल तसेच पुढच्या पिढीतील सोल्युशन्स लाँच करणे आणि उद्योगविश्वाकरिता भक्कम पाया उभारणे, ही आमची उद्दिष्टे आहेत.”

क्विक हिल टेक्नोलॉजी लिमिटेडचे मुख्य वित्त अधिकारी श्री नितीन कुलकर्णी म्हणाले, “आम्ही तिमाही आणि संपलेल्या वर्षात मजबूत आर्थिक कामगिरी करत सकारात्मक स्थिती गाठली आहे. या तिमाहीत, मजबूत उच्चस्तरीय वृद्धीसह, आम्ही कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आम्ही ईबीआयटीडीए मार्जिनही वाढवण्यात यशस्वी झालो. शेअरहोल्डर्सना सातत्याने पुरस्कार देण्याचे आमचे तत्त्व असून मागील तिमाहीत आम्ही इक्विटी शेअर्स बायबॅकची घोषणा केली. जे आमच्या भांडवल वाटप धोरणानुसार योग्य असून ते -ईपीएस वृद्धीसाठी अनुकुल असले पाहिजे. शून्य कर्ज आणि ४,८०९ दशलक्ष रुपये रकमेच्या समकक्ष रोखीसह आमची बॅलेन्स शीट मजबूत स्थितीत आहे.”


Back to top button
Don`t copy text!