दैनिक स्थैर्य । दि. ०६ मार्च २०२२ । नागपूर । क्विक हील या जागतिक सायबर सिक्युरिटी सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून नागपूरमध्ये ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा अवॉर्ड्स’चे आयोजन केले. सहभागी शिक्षण संस्था, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेषत: महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील वंचित समुदायांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता पसरवत केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी या पुरस्कार सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला. क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीम. अनुपमा काटकर आणि सहा सहभागी संस्थांमधील शिक्षणतज्ज्ञ यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, नागपूर येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. प्रांतातील शिक्षण संस्थांमध्ये गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, नागपूर; प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, नागपूर; सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज, कामठी; शंकरलाल खंडेलवाल कॉलेज, अकोला; सुधा सुरेशभाई मणियार कॉलेज, नागपूर आणि जे. एम. पटेल कॉलेज, भंडारा यांचा समावेश होता. या सोहळ्याला सहभागी संस्थांमधील १४० हून अधिक स्वयंसेवक उपस्थित होते.
क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या ऑपरेशनल एक्सलन्सच्या प्रमुख श्रीम. अनुपमा काटकर म्हणाल्या, ‘‘मी सायबर सुरक्षिततेबाबत शिक्षणाचा प्रसार अनेक भविष्य सुनिश्चित करण्याप्रती पाऊल उचलण्यासाठी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करते. त्यांची शिकण्याप्रती, विकसित होण्याप्रती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याप्रती उत्सुकता प्रशसंनीय आहे. क्विक हीलमध्ये आमचा आमच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून विश्वास आहे की, आजच्या युगात सायबर शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आम्हाला ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ उपक्रमाला भव्य यशस्वी करण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक व विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंद होत आहे. आम्ही आपल्या डिजिटल विश्वाला अधिक सुरक्षित व अधिक विश्वसनीय करण्याप्रती त्यांच्या कटिबद्धतेचे कौतुक करतो आणि या महत्त्वपूर्ण प्रयत्नांचा भाग बनल्याबाबत आमच्या सर्व सहयोगींचे मनापासून आभार मानतो.’’