दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । क्विक हील या जागतिक स्तरावरील आघाडीच्या सायबर सिक्युरिटी उपाययोजना पुरवठादाराने आज गोडीपडॉटएआय ( GoDeep.AI) या मालवेअर शोधणाऱ्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन २३ वी आवृत्ती आणली असून त्यातून भविष्यासाठी सुरक्षित उपाययोजनांची निर्मिती केली जाणार आहे. ही आवृत्ती स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत पद्धतीने तयार केली गेली आहे आणि त्यात कंपनीच्या पर्यावरण संवर्धनाप्रति ध्येयांचा तसेच सायबर सुरक्षा सर्वांसाठी एक मुलभूत हक्क बनवण्याच्या विचारांचा पुनरूच्चार करण्यात आला आहे.
क्विक हील व्हर्जन २३ हे गोडीपडॉटएआय सोबत अधिक स्मार्ट झाले आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानातून सायबर हल्ला शोधून धोक्याचे गांभीर्यच तपासले जात नाही तर विविध प्रकारच्या सखोल अभ्यास, वर्तणूकीचे विश्लेषण आणि अचूक अंदाज यांच्याद्वारे असे धोकेही दूर केले जातात. त्यामुळे धोके शोधण्याचा वेळ खूप कमी होतो, अँटी रॅन्समवेअर संरक्षण, रिअल टाइम इंजिन स्कॅन, अँटी ट्रॅकर आणि डेटा ब्रीचमध्ये सूचना अशा अद्ययावत धोका ओळखणा-या वैशिष्ट्यांसह व्हर्जन २३ अधिक सुरक्षित झाले आहे.
क्विक हीलचे सह व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. संजय काटकर म्हणाले की, “जागतिक साथीनंतरच्या जगात सायबर हल्ल्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. हे हल्ले इतके अद्ययावत झाले आहेत की साधी कार्यान्वयन यंत्रणा संरक्षण किंवा मोफत अँटीव्हायरस त्यांना थांबवू शकत नाही. त्यामुळे क्विक हीलमध्ये आम्ही व्हर्जन २३ या मालवेअर हल्ला स्वतःहून शोधणाऱ्या गोडीपडॉटएआयसोबत सुसज्ज सायबरसुरक्षा उपाययोजनेचा समावेश करून त्याचे नवसंशोधन, पुनर्निर्मिती आणि रचना केली आहे. आम्हाला खात्री आहे की, व्हर्जन २३ सारखी स्मार्ट, सुरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत उपाययोजना कार्बन फूटप्रिंट कमी करण्याबरोबरच सर्व टप्प्यावर डिजिटल सुरक्षा देऊन तुम्हाला ‘सिक्युरयुअरपीस’चा लाभ देईल.”
ईएसजीवर लक्ष केंद्रित करून शाश्वत भविष्याप्रति वचनबद्धता दर्शवणारे क्विक हील व्हर्जन २३ सीडीरहित आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ई कचरा कमी होऊन कार्बन फूटप्रिंटही कमी होते. कंपनीने बॉक्समधील कागदाचे प्रमाणही कमी केले आहे आणि उत्पादनाच्या बॉक्स पॅकेजिंगचा आकार सुमारे ३८ टक्के कमी केला आहे. त्यामुळे कागदाचा वापर कमी होऊन प्रवासादरम्यान इंधनाचीही गरज कमी होते. हे पॅकेजिंग आता प्लास्टिकमुक्त आहे आणि त्यात १०० टक्के जैव विघटनक्षम आणि १०० टक्के रिसायकल होणारे साहित्य वापरले गेले आहे.
क्विक हीलचे वैध कार्यरत सबस्क्रिप्शन असलेल्या विद्यमान क्विक हीलच्या सर्व वापरकर्त्यांना क्वीक हीलच्या वेबसाइटवर भेट देऊन नवीन अपग्रेड मोफत डाऊनलोड करता येईल. नवीन ग्राहकांना क्विक हीलच्या वेबसाइटवरून, ई-वाणिज्य स्टोअर्स किंवा देशभरातील ३५००० पेक्षा अधिक भागीदार स्टोअर्समधून खरेदी करताना अद्ययावत आवृत्ती मिळू शकेल.