क्विक हीलने कोल्हापूरातील सुविधांपासून वंचित लोकांसाठी मोदमृत यान भेट दिली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । मुंबई । क्विकहीलने आपल्या सीएसआर शाखेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील वंचित समुदायांना मोदमृत यान प्रदान केली. श्री सदगुरू विश्‍वनाथ महाराज रूकडीकर ट्रस्टसोबत सहयोगाने ही अत्याधुनिक व्हॅन गरजू व्यक्तींना पोषण व चांगले आरोग्य देईल. ‘निरोगी माता, निरोगी मूल’ या ब्रीदवाक्यासह ट्रस्टची मोदमृत पोषण आहार मोहीम कुपोषित महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी कार्य करते.

क्विकहील टेक्नोलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलाश काटकर, क्विकहील फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीम. अनुपमा काटकर आणि श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रूकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर यांच्या उपस्थितीत हा दान सोहळा पार पडला.

क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीम. अनुपमा काटकर म्हणाल्या, ‘‘तरुण मुले देशाचे भविष्य घडवतात. त्यामुळे फक्त मुलांचेच नव्हे तर त्यांचे पालनपोषण करणाऱ्या मातांचे पोषण आणि आरोग्य याला अधिक महत्त्व देणे अत्यावश्यक आहे. ‘सेक्युरिंग फ्युचर्स’ हे आमच्या सीएसआर उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि वंचित महिला व बालकांच्या कल्याणासाठी मोदमृत व्हॅन सादर करत आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.’’

क्विक हील सीएसआर उपक्रमाची मोदमृत त्यांच्या आरोग्य यान उपक्रमाचे विस्तारीकरण आहे, ज्या अंतर्गत ते देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या वंचित समुदायांना उत्तम आरोग्याची भेट देण्यासाठी संपूर्ण सुसज्ज वैद्यकीय व्हॅन दान करतात. आतापर्यंत १५ आरोग्य प्रदान करत त्यांनी १० राज्यांमधील ६०० हून अधिक गावांपर्यंत पोहोचत ११ लाखांहून अधिक व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.


Back to top button
Don`t copy text!